नागपूर: आरोग्याची काळजी घेऊन निरोगी आयुष्य जगण्यात अन्न पदार्थांचा मोठा असतो, त्यामुळे डॉक्टर असोत की अनुभवी व्यक्ती सर्वात आधी हेल्दी फूड घेण्याचा सल्ला देतात, पण हे काय स्मार्ट सिटीच्या सीईओना ‘हेल्दी स्ट्रीट’ करायचे आहेत. नेमके काय, कसे असते हे स्ट्रीट जाणून घेऊया.
वाहतुकीची कोंडी आणि पायी चालणाऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ‘हेल्दी स्ट्रीट’ हा प्रकल्प शहरात राबवण्यात येणार आहे, अशी माहितीही पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. स्मार्ट सिटीकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात महापालिकेबरोबरच नासुप्र, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मालकीचे रस्ते आहेत. त्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी हा आराखडा संबंधित संस्थांशी होणाऱ्या बैठकीत मांडला जाणार आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावर पायी चालणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या रस्त्यांवरच एनएमटीची संकल्पना राबवण्यात येणार आहे.