बुलढाणा: मुंबईत ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर २ डिसेंबर पासूनतात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत ये जा करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध ०२ डिसेंबर २०२४ ते ०९ डिसेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : मानव – वन्यजीव संघर्ष : ४ वर्षांत ५९ वाघ, ३९ बिबट्या अन् १४६ नागरिकांचा मृत्यू

या स्थानकांचा समावेश

मुंबई विभाग मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण; भुसावळ विभाग मधील बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक, नागपूर विभाग मधील नागपूर आणि वर्धा, पुणे विभाग मधील पुणे, सोलापूर विभाग मधील सोलापूर स्टेशन या स्थानकांना सवलत देण्यात आली आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.