नागपूर : राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवर १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ दोन महिन्यात दुप्पट अपघात होऊन मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपघाताची आकडेवारी एकत्र केल्यास या काळात २ हजार ८०२ अपघातात १ हजार ४१८ मृत्यू झाले.

राज्यात १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राज्य महामार्गावर ९८४ अपघातात ५१८ नागरिकांचा तर राष्ट्रीय महामार्गावर १ हजार ८१८ अपघातात ९०० नागरिकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी बघता महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर जवळपास दुप्पट अपघात व मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

md predicted unseasonal rain hailstorm in maharashtra
राज्यात आठ दिवस पावसाचा मुक्काम; मोसमी वाऱ्यांबाबतही गुड न्यूज
Pune, Expressway,
पुणे : शनिवारी, रविवारी एक्स्प्रेस-वे वापरताय? ही बातमी वाचाच…
tigress, subway, cubs,
वाघीण आपल्या बछड्यांसह भुयारी मार्गातून जाते तेव्हा… ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर…
employees, ST, ST Corporation,
एसटी महामंडळात गर्दीचा हंगाम पाहून कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई? झाले असे की…
bus, Nagpur-Tuljapur National Highway,
एसटी बस दरीत कोसळता कोसळता वाचली! नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
boats, Mahabaleshwar,
पर्यटकांसाठी महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये आकर्षक बोटी, उन्हाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज
More than five passengers died in a bus accident near Chandwad
नाशिक : चांदवडनजीक बस अपघातात पाचपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू
shivaji park dadar marathi news
शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर

हेही वाचा…आमच्यातील काही स्वार्थी लोक माझ्या विरोधात विषारी प्रचार करताहेत!…विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणावर?

नागपूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर, छत्रपती संभाजीनगर शहर या चार शहरांची १ जानेवारी २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यानची अपघातांची आकडेवारी बघता सर्वाधिक २ हजार ८९२ अपघातात मुंबईत ४२६ नागरिकांचा मृत्यू झाला. नागपुरात १ हजार ४२६ अपघातात ३८२ मृत्यू, पुण्यात १ हजार ४७१ अपघातात ४१३ मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७०८ अपघातात २३४ मृत्यू झाले.

हेही वाचा…५०० रुपयांसाठी केली हत्या, न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

छोट्या वाहनांच्या अपघतात मृत्यू अधिक

राज्यात २०१९ मध्ये बसच्या १ हजार ११० अपघातात २४६ मृत्यू तर कार, टॅक्सी, व्हॅन व हलक्या वाहनांच्या ३ हजार २७३ अपघातात १ हजार ५७६ मृत्यू झाले. ट्रक, लॉरीच्या १ हजार ९६४ अपघातात ६२७ मृत्यू झाले. २०२० मध्ये बसच्या ३५४ अपघातात १०६ मृत्यू तर कार, टॅक्सी, व्हॅन, हलक्या वाहनांच्या ३ हजार २७३ अपघातात १ हजार ५७६ मृत्यू झाले. ट्रक, लॉरीच्या १ हजार ९६४ अपघातात ६२७ मृत्यू झाले. २०२२ मध्ये बसच्या ४८३ अपघातात ११९ मृत्यू तर कार, टॅक्सी, व्हॅन व हलक्या मोटार वाहनांच्या ५ हजार ४५ अपघातात २ हजार २२१ मृत्यू झाले. ट्रक, लॉरीच्या १ हजार ७६२ अपघातात ८०६ मृत्यू झाले.