लोकसत्ता टीम

भंडारा: सध्या स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्याच्या मुसक्या आवळत धाडसत्र सुरू केले आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आणखी एका बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून हितेश प्रकाश हरधनिया ( ३३) रा. शास्त्रीनगर, भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १७ हजार २०० रुपये किमतीचा किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम क्रिकेट सामन्यात फलंदाजी करत होता. तर दुसरीकडे या सामन्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सट्टा लावण्यात काही सट्टेबाज मग्न होते. शहरातील शास्त्री नगर मध्ये सुध्दा सट्टा जोमात होता. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने शास्त्रीनगर येथे छापा टाकून हितेशला बेटिंग करताना रंगेहात पकडले. मोबाइल फोनसह १७,२०० रुपयांचा माल, रोख २२०० रुपये एलसीबीने जप्त केले. या आधी खात रोड, गणेशपुर या ठिकाणांहून पोलिसांनी सट्टेबाजांना अटक केली आहे.

हेही वाचा… नागपूर, मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या कोणती गाडी रद्द

ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश देशमुख, उपनिरीक्षक प्रीती कुळमेथे, सहायक पोलीस अधिकारी प्रदीप डहारे, पोलीस हवालदार निरंजन कातकडे यांच्या पथकाने केली. , किशोर मेश्राम, रमेश बेदुरकर, विजय तायडे, अंकोश पुराम, सचिन देशमुख यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.