नागपूर : नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. या दिवशीपासून सातत्याने नागपूरसह राज्यभरात सोने- चांदीचे दर वाढत असल्याचे चित्र होते. परंतु सोमवारी ६ जानेवारीला मात्र सोने- चांदीच्या दरात प्रथमच घट झाल्याचे दिसत आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूरसह राज्यभरात नववर्षाचे स्वागत काही कुटुंबीयांकडून शेती, फार्महाऊस, पर्यटन स्थळ अथवा हॉटेल्स वा इतरत्र केले गेले. नववर्षात, लग्न, वाढदिवस वा इतर कार्यक्रमात काही नागरिक आपल्या जवळच्या नातेवाईकांना विविध दागिन्यांची भेट देतात. त्यामुळे पहिल्या दिवशी नागपूरसह सर्वत्र सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी होती. आताही लग्नाची धूम सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे लग्नात दागिने बनवणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.

हेही वाचा…धक्कादायक! उपराजधानीत अनेक ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये देहव्यापार…

दरम्यान, नववर्षात नागपुरात सोन्याचे दर सातत्याने वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. परंतु सोमवारी ६ जानेवारीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात ३ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ६०० रुपये होते. हे दर ६ जानेवारी २०२५ रोजी प्रति दहा ग्राम ७७ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात ३ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत ६ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. ही घट २४ कॅरेटमध्ये ६०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४०० रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. येत्या काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या सोने- चांदी खरेदीत गुंतवणुकीची ग्राहकांना चांगली संधी असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणने आहे.

हेही वाचा…“एक लाख द्या अन् पाच लाख घ्या,” इन्स्टाग्रामवरील दाव्याने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात ३ जानेवारी २०२५ ला चांदीचे दर ८९ हजार रुपये प्रति किलो होते. हे दर ६ जानेवारी २०२५ रोजी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आले. त्यामुळे ३ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत नागपुरात ६ जानेवारी २०२५ रोजी चांदीच्या दरात ४०० रुपये प्रति किलो घट झाली आहे.