चंद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. २०२४ चा पराभवाच्या भीतीतून खासदारकी रद्द करण्याची कारवाई मोदी सरकारने केली, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्यांची खासदारकी अशा मार्गाने रद्द करणे हीच हुकूमशाहीची अधिकृत सुरुवात आहे, अशी टीका काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

हेही वाचा – विदर्भात पुन्हा विजांचा कडकडाट, ७ शेतमजूर जखमी

हेही वाचा – चंद्रपूर : सायली, आकाशसोबत विद्यार्थ्यांनी धरला ठेका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला आहे. मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने ३० दिवसांचा अवधी देऊन देखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अदानी प्रकरणावर मोदी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे संसदेबाहेर राहुल गांधींना काढण्याचे पाप या सरकारने केले, असे धानोरकर म्हणाले.