महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून २०१८ ला संप केल्यावर महामंडळातील काही विभागांनी संपकर्त्यांचे १६ दिवसांचे तर काहींनी दोनच दिवसांचे वेतन कापले होते. परंतु मुंबई औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे महामंडळाने एका दिवसाच्या संपासाठी दोन दिवसांच्या पगार कपातीचे आदेश नुकतेच काढले. मात्र सणासुदीत कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने या कपातीलाही तात्पुरती स्थगिती दिली आहे. 

एसटीचे अनेक कर्मचारी ८ आणि ९ जून २०१८ रोजी संपावर होते. त्यावर महामंडळाने एका दिवसाच्या संपासाठी आठ दिवस असे दोन दिवसांच्या संपासाठी १६ दिवसांच्या वेतन कापले. काहींनी दोन दिवसांसाठी दोनच दिवसांची वेतन कपात केली. दरम्यान, मुंबई औद्योगिक न्यायालयाने नुकताच निर्णय घेत एका दिवसाच्या संपासाठी केवळ दोन दिवसांच्या वेतन कपातीचा निर्णय दिला.

या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली. तर दोन दिवसांचे वेतन कपात झालेल्यांनाही ऐन सणासुदीत आर्थिक फटका बसणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने वेतन कपातीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. 

सणासुदीत वेतन कपातीने आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तूर्तास या कपातीला स्थगिती दिली आहे, परंतु दिवाळीनंतर वेतन कापले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अजित गायकवाड, महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.), एसटी महामंडळ, मुंबई.