गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड नक्षली हिंसाचार प्रकरणी ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी जामिनाकरिता दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळला .याप्रकरणी न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सूरजागड लोह खाण परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली होती.

हेही वाचा >>> बुलढाणा : रात्री लघुशंकेसाठी रस्त्यालगत गेला अन् थेट एका विहिरीत पडला, पुढे झाले असे की..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात इतर आरोपींसह ॲड. सुरेंद्र गडलिंग यांच्याविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) गडचिरोली येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यानुसार, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कायद्यातील कलम २२, २१ (४), ४३९ अन्वये त्यांची चौकशी सुरू आहे. गडचिरोली सत्र न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता. त्याविरुद्ध त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. ॲड. गडलिंगतर्फे ॲड. फिरदौस मिर्झा तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील नीरज जावडे यांनी बाजू मांडली.