नागपूर : जयपूर येथे येत्या २३ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाचा १७ सदस्यीय संघ घोषित करण्यात आला. संघाचे नेतृत्व सलामीवीर अथर्व तायडे करणार आहे. सुहास फडकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसीएच्या वरिष्ठ निवड समितीच्या बैठकीत संघाची निवड करण्यात आली. मोहाली येथे अलीकडेच खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेत संधी न मिळालेल्या मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीला यावेळी संधी देण्यात आली आहे. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवही संघात कायम आहे.

हेही वाचा : सीतासावंगीत बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला, शिकारीचा अंदाज

विदर्भाच्या संघात अथर्व तायडे (कर्णधार), जितेश शर्मा, अक्षय वाडकर (यष्टीरक्षक), ध्रुव शोरी, करुण नायर, शुभम दुबे, आर. संजय, मोहित काळे, अक्षय कर्णेवार, दर्शन नळकांडे, हर्ष दुबे, यश कदम, अमन मोखाडे, नचिकेत भुते, रजनीश गुरबानी, यश ठाकूर व उमेश यादव यांचा समावेश राहील. राखीव खेळाडू म्हणून यष्टीरक्षक सिद्धेश वाठ,यश राठोड, आदित्य ठाकरे, पार्थ रेखडे, दानिश मालेवार यांचा संघात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रशिक्षकाची भूमिका उस्मान गनी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अतुल रानडे राहतील. याशिवाय सहायक चमूत युवराजसिंग दसोंधी, नितीन खुराणा,अजिंक्य सावळे, शिरीष जोशी यांचा समावेश राहील.