गोंदियाच्या तरुणाने फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली आहे. हर्षल कैलाश टेंभुर्णे (२६) रा. कोहमारा, गोंदिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पीडित तरुणी नागपुरातील आहे. हर्षल टेंभूर्णे हा नागपुरातील एका अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. जानेवारी महिन्यात हर्षलची तरूणीसोबत फेसबुकवर मैत्री झाली.

हेही वाचा – चंद्रपूर : हवाई रुग्णवाहिका धावपट्टीवर आली , पण अंधारामुळे रुग्ण घेऊन न जाताच निघून गेली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. हर्षल तरुणीची भेट घेण्यासाठी तिच्या खोलीवर जात होता. १ जानेवारीला दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवले. गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहात होते. काही दिवस लैंगिक शोषण केल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. हर्षलने तिला लग्नास नकार दिला. तिने अंबाझरी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवून हर्षलला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.