नागपूर : सोन्याच्या दरात घसरणीचा क्रम कायम आहे. १४ फेब्रुवारीला दुपारी नागपुरात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ६१ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर गेल्या काही महिन्यांची आकडेवारी बघितली तर निच्चांकीवर असल्याचे दिसत आहे. नागपूरसह राज्यात सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ- उताराचा क्रम कायम आहे. नागपुरात बुधवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६१ हजार ९०० रुपये होते. हे दर अनेक महिन्यानंतर ६२ हजार रुपयाहून खाली आले आहे. तर नागपुरात २२ कॅरेटसाठी ५८ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४० हजार २०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ६९ हजार ९०० रुपये होते.

हेही वाचा : VIDEO : ‘नयनतारा’ पडली प्लास्टिक बाटलीच्या प्रेमात! ताडोबातील जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यावरून पाणी न पिता बाटली घेऊन परतली…

दरम्यान १२ फेब्रुवारीला येथे २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार रुपये होते. २ फेब्रुवारीला हे दर २४ कॅरेटसाठी ६३ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ५०० रुपये होते. दरम्यान २ फेब्रुवारीच्या तुलनेत १४ फेब्रुवारीच्या दराची तुलना केल्यास हे दर प्रति दहा ग्राम तब्बल १ हजार ६०० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे लग्न समारंभासह इतर कारणांनी सोन्याची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोन्याच्या दरात सतत बदल होत असले तरी काही महिन्यात हे दर ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा : सावधान! ‘स्वाईन फ्लू’ पुन्हा परतला, ‘या’ शहरात गेले दोन बळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोन्याचे दागीने खरेदीसाठी चांगली संधी

नागपुरात गेल्या काही महिन्यानंतर प्रथमच सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६२ हजाराहून खाली आले आहे. सध्या दर कमी असले तरी हे दर लवकरच पून्हा वाढण्याचे संकेत नागपूर सराफा व्यवसायीकांकडून दिले जात आहे. त्यामुळे सध्या कमी दरात सोन्याचे दागीने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचेही सराफा व्यवसायीक सूचवत आहे.