Today Nagpur News Updates : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीची प्रचंड वर्दळ असल्याने तेथे अपघातांची अधिक असते, असा समज आहे. मात्र आता मागास समजला जाणारा गडचिरोली जिल्हाही अपघातामध्ये बड्या शहरांना टक्कर देत आहे. गडचिरोलीत सातत्याने अपघात वाढत असून एका हजारांहून अधिक लोकांनी यात जीव गमावला आहे. तीन दिवसापूर्वी तर आर्वीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसून काळे यांनी केलेले हितगुज संशयाचे सावट गडद करणारे ठरले. त्यातच खा. काळे यांनी एक फाइल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढ्यात धरून त्यावर त्याच क्षणी त्यांची घेतलेली स्वाक्षरी भुवया उंचावणारी ठरली. तेव्हा नागपूर असो किंवा गडचिरोली…नागपूर शहरापासून संपूर्ण विदर्भातील राजकीय, वाहतूक, गुन्हे तसंच सामाजिक क्षेत्र…सर्व क्षेत्रातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.

Live Updates

Nagpur Vidarbha Maharashtra News Today, 17 April 2025

20:35 (IST) 17 Apr 2025

हिंदीची सक्ती : वडेट्टीवार म्हणतात,  "हा तर  केंद्राकडून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न"

हिंदी भाषेची सक्ती करणे म्हणजे मराठीवर अन्याय आहे.  हा एकप्रकारे केंद्रातून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...वाचा सविस्तर
20:23 (IST) 17 Apr 2025

मान्सून दरम्यान सज्जतेसाठी जिल्हा प्रशासनाची बैठक; खड्डे भरणे, राष्ट्रीय महामार्ग लगत भराव घालण्यात येणार नाहीत इत्यादी सूचना निर्देशित

आगामी मान्सूनच्या दृष्टिने जिल्ह्यातील प्रशासन सज्ज राहावे या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन मान्सून दरम्यान सर्व विभागाने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. ...सविस्तर बातमी
19:11 (IST) 17 Apr 2025

‘शालार्थ आयडी’ घोटाळा: आता सायबर पोलीस उल्हास नरड यांना अटक करणार, कारवाईच्या भीतीने तीन अधिकारी बेपत्ता

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. ...सविस्तर वाचा
19:11 (IST) 17 Apr 2025

‘शालार्थ आयडी’ घोटाळा: आता सायबर पोलीस उल्हास नरड यांना अटक करणार, कारवाईच्या भीतीने तीन अधिकारी बेपत्ता

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. ...सविस्तर वाचा
19:06 (IST) 17 Apr 2025

अवैध बांगलादेशींचा मुद्दा, भाजप नेते किरीट सोमय्या पुसद पोलीस ठाण्यात…

पुसद शहरात बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असून अशा नागरिकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा  या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात  ठाण मांडले. ...सविस्तर बातमी
19:06 (IST) 17 Apr 2025

अकोल्यात पाणी पेटले; ठाकरे गटाकडून तोडफोड

वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांवर जलसंकट देखील कोसळले आहे. शहरातील विविध भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...वाचा सविस्तर
18:58 (IST) 17 Apr 2025

मध्यरात्रीनंतर युवकांनी शर्ट काढून घातला गोंधळ; गृहमंत्र्यांच्या शहरात चाललंय तरी काय?

नेहमी गजबजलेल्या धरमपेठ सारख्या उच्चभ्रू वस्तीत काही टारगट युवकांची टोळी मध्यरात्रीनंतर शर्ट न घालता नेहमी गोंधळ घालते. ...वाचा सविस्तर
18:49 (IST) 17 Apr 2025

‘एमपीएससी’ची राज्यसेवा २०२४ मुख्य परीक्षा पुढे, परंतु आरक्षणाचा तिढा कायम!

आयोगाने हा गुंता सोडवण्यासाठी पूर्व परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करून ३१८ नवीन ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना अर्जाची संधी दिली. ...सविस्तर बातमी
18:21 (IST) 17 Apr 2025

' आयडॉल शिक्षक व संस्था बँक ' राज्यात स्थापन होणार, अशी होईल निवड

विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ही महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तसे अनुकरण देशभर झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य सरकारने विविध अनोखे कार्यक्रम राबविले असून त्यात आता नवा उपक्रम जोडल्या जाणार. ...सविस्तर बातमी
17:58 (IST) 17 Apr 2025

ब्रम्हपूरी वनक्षेत्रातील वाघाला केले जेरबंद

वाघाला जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...अधिक वाचा
17:24 (IST) 17 Apr 2025

कॉंग्रेसची सद्भावना यात्रा: प्रदेशाध्यक्ष म्हणाले " भाजपने म्हणून औरंगजेब कबरीचा मुद्दा बाजूला केला "

काँग्रेसने जेव्हा इंग्रजांना मदत करणारे,. इंग्रज सरकारकडून पेंशन घेणाऱ्याच्या कबरी उदध्वस्त करा, अशी मागणी केली. ...सविस्तर बातमी
16:56 (IST) 17 Apr 2025

सुधीर मुनगंटीवार यांच्यासह तीन सत्ताधारी आमदारांना न्यायालयाची नोटीस, चार आठवड्यात…

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...वाचा सविस्तर
16:33 (IST) 17 Apr 2025

जनसुरक्षा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला- लीलाताई चितळे

समाजात शांतता आणि सलोखा निर्माण व्हावा यासाठी महिलांनी पुढाकार घेत ‘अमन आणि शांतीसाठी हा महिला जत्था’ कार्यक्रम घेतला. ...सविस्तर बातमी
15:32 (IST) 17 Apr 2025

दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म आढळले, भूशास्त्र  संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांचा दावा

महाराष्ट्रात अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. ...अधिक वाचा
14:44 (IST) 17 Apr 2025

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, गोंदियात तणाव…

एका उच्चभ्रू कुटुंबातील व्यापारी तरुणाने हे कृत्य केल्याने गोंदिया शहरात तणावपूर्ण शांतता आहे. ...अधिक वाचा
14:30 (IST) 17 Apr 2025

सोन्याचे दर दोन तासात दोनदा घसरले… चांदीच्या दरातही…

लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले असून ग्राहकांमध्ये चिंता आहे. त्यातच गुरूवारी (१७ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याचे दर दोन तासातच दोनदा घसरले. ...अधिक वाचा
13:09 (IST) 17 Apr 2025

भाजप आमदार म्हणतात, काँग्रेसची सद्भावना यात्रा सनातन धर्माचा अपमान करणारी

काँग्रेसद्वारा नागपुरात काढण्यात आलेली सद्भावना यात्रा सनातन धर्माचा अपमान करणारी आहे, अशी टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. ...सविस्तर बातमी
12:38 (IST) 17 Apr 2025

एमपीएससी : गट ‘क’ लिपिक टंकलेखक संवर्गाची यादी जाहीर

जुलै २०२४ मध्ये टंकलेखन परीक्षा घेण्यात आली असली तरी विविध कारणांनी या परीक्षेचा निकाल आणि नियुक्त्या रखडल्या होत्या. ...सविस्तर वाचा
12:38 (IST) 17 Apr 2025

पंढरपूरचे विठू-माऊली आता लंडनला स्थायिक होणार

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडन म्हणजेच युके येथे साकारले जाणार आहे. त्‍यानिमित्ताने १५ एप्रिलला पंढरपूर ते लंडन आंतरराष्ट्रीय दिंडी बुधवारी नागपुरात पोहोचली. ...वाचा सविस्तर
12:37 (IST) 17 Apr 2025

खासदारांच्या भाजप सत्ताधाऱ्यांशी वाढत्या भेटी, चर्चेला उधाण आणि खासदार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांच्या भेटीगाठी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. ...सविस्तर बातमी
12:34 (IST) 17 Apr 2025

बापरे, गडचिरोलीत रस्ते अपघातात १०६४ मृत्यू…

मागास समजला जाणारा गडचिरोली जिल्हाही अपघातामध्ये बड्या शहरांना टक्कर देत आहे. गडचिरोलीत सातत्याने अपघात वाढत असून एका हजारांहून अधिक लोकांनी यात जीव गमावला आहे. ...वाचा सविस्तर
12:33 (IST) 17 Apr 2025

दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री अवकाळीचा जोर, हवामान खाते म्हणाले…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने आता पुन्हा एकदा नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. ...सविस्तर बातमी

 

Nagpur Breaking News Live Today in Marathi

नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स