नागपूर : राज्याच्या अनेक भागात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विशेषकरून विदर्भाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आणखी तीन दिवस हा पाऊस असणार आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट” देण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. तर काही भागात मात्र मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी खरंच नागपुरात अरेरावी केली? भाजपानं ‘तो’ Video केला ट्वीट, काँग्रेसवर टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिक्कीमपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भासह कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. सध्या नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.