नागपूर : पती-पत्नीवर विश्वास ठेवून एकाने त्याचे दुकान त्यांना सांभाळायला दिले. मात्र, दररोज दुकानात जमा होणाऱ्या पैशांमुळे त्यांचा स्वार्थ जागा झाला. या दोघांनी विश्वासघात करून दुकान मालकाची १८ लाख ९० हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. महेश जेठानी (४५), भव्या जेठानी (३४) रा. जरीपटका अशी आरोपी पती-पत्नीची नावे आहेत.

फिर्यादी सुरेश देवकुडे (६३, भोसलेनगर, सक्करदरा) यांचे छत्रपती चौक येथे रंगोली कलेक्शन या नावाने कपड्यांचे होलसेल दुकान आहे. त्यांनी २०२२ मध्ये आरोपी पती- पत्नीला दुकान सांभाळण्यासाठी दिले. मोठ्या विश्वासाने दुकानाचा संपूर्ण कारभार त्यांच्यावर सोपविला. देवकुडे हे अधूनमधून दुकानात जायचे. मात्र विशेष लक्ष घालत नव्हते. याच संधीचा फायदा घेत पती-पत्नीने विक्री केलेल्या कपड्यांचा हिशोब दिला नाही. त्यामुळे देवकुडेंना संशय आला. ज्या दुकानदारांना कपडे विकले, त्यांची भेट घेऊन विचारपूस केली असता देवकुडेंच्या पायाखालची वाळू सरकली.

हेही वाचा – भारतात प्रथमच नवीन ‘ग्रीन लिंक्स’ कोळी प्रजातीचा शोध….

हेही वाचा – फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मतिन भोसलेंचा सन्मान, राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पती-पत्नीने तब्बल ५६ दुकानदारांना कपडे विकून रोख रक्कम घेतल्याचे व काही रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केल्याचे समोर आले. एकूण १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादीने पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.