नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिसभा पदवीधर निवडणुकही महाविकास आघाडी लढविणार असून उमेदवारांची घोषणा डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. खुल्या प्रवर्गात मनमोहन वाजपेयी, हेमंत सोनारे, अमित काकडे, प्रवीण भांगे, माधुरी पालिवाल, प्रवीण उदापुरे, राखीव प्रवर्गात किरण अजबले (महिला), दिनेश धोटे (ओबीसी), कुणाल पाटील (एससी), मुकेश पेंदाम (एसटी), खीमेश बढिये (एनटी) हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

एकूण १० जागांसाठी ११ उमेदवारांची घोषणा आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे समसमान उमेदवार आहेत. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून येत्या १९ मार्चला मतदान आहे. सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे डॉ. तायवाडे म्हणाले. सर्व दहाही जागा निवडून आणू. नागपूर पदवीधर, शिक्षक, अमरावती पदवीधर मतदार संघात आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी परिवर्तन झाले असून हा विद्यापीठातील बदलाचा संकेत आहे.

हेही वाचा >>> वाशीम : वादळी पावसामुळे संत्रा पिकांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूकसुद्धा जिंकू, असा विश्वास आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला. या आघाडीत यंग टिचर्स असोसिएशन, सेक्युलर पॅनेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स ऑर्गनायझेशन असून इतरही धर्मनिरपेक्ष व आंबेडकरी संघटना आघाडीस सहकार्य करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये म्हणाले. सर्व उमेदवारांसह, आ. सुधाकर अडबाले, गिरीश पांडव, तानाजी वनवे, दुनेश्वर पेठे, सलील देशमुख, पूरण मेश्राम, हर्षल काकडे, विशाल बरबटे, राजू हरणे, नितीन तिवारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.