नागपूर : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे भाकित केले आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावा, असे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले विधान चर्चेत आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे.

हेही वाचा…‘एमपीएससी’मध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा वाद; परीक्षा, निकालावर काय परिणाम होणार?

महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकत्रित विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे, असे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट युती सरकारने मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला आहे.

अदानीला महत्वाच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या जात आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचाच लिलाव सुरु केला आहे. भाजपा सरकारने दिल्लीतील लाल किल्लाही त्यांच्या बगलबच्च्यांना देऊन टाकला आहे. फक्त शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव या भ्रष्ट सरकारने काढला आहे, महाराष्ट्राची लूट सुरु आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली. हिंडनबर्ग अहवाल व सेबी प्रमुखांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, शेअर मार्केटमध्ये पैसाही सुरक्षित राहिलेला नाही.

हेही वाचा…चौघांचा बळी घेणारा ‘तो’ अखेर पश्चिम बंगालमधून ताब्यात; वर्धा पोलिसांनी…

सेबीचे अध्यक्ष, अदानी व त्यांच्यामागे पंतप्रधान अशा प्रकारचे चित्र दिसत आहे. ही भ्रष्ट यंत्रणा केंद्र सरकारने निर्माण केली आहे, म्हणून राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. याचाच अर्थ भ्रष्टाचाराची पाळेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसपास फिरत आहेत असे पहायला मिळत आहे, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा…“रामदास आठवले हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार,” कोण म्हणतंय असं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असले तर त्यांनी सांगावे, असेही शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी काल,मंगळवारी विधान केले होते. त्याबाबत विचारले असता, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असेल, निवडणूकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू, असे पटोले म्हणाले.