नागपूर : देशातील गुन्हेगारी झपाट्याने वाढली असून सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात घडले. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये नागपूर सहाव्या स्थानावर आहे. ही माहिती नुकताच एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा >>> ‘ त्या’ खुनाचा छडा लागला, तेव्हा बाहेर आले धक्कादायक सत्य

राज्यातील हत्याकांडाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिल्लीनंतर मुंबईतच सर्वाधिक हत्याकांड घडले आहेत. दिल्लीत ४५४ खून झाले तर मुंबईत १६२ खुनांच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (३.६७ लाख) गुन्हे दाखल झाले, त्यानंतर उत्तर प्रदेशात (३.५८ लाख) तर तिसऱ्या स्थानावर चेन्नई आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२१ वर्षाच्या गुन्हेविषयक अहवालानुसार, देशात एकूण ३,६७,२१८ गुन्ह्यांची नोंद झाली असून महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. उत्तरप्रदेश ३,५७,९०५ गुन्ह्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे मुंबईत आहेत. नागपूर सहाव्या आणि पुणे १४ व्या स्थानावर आहे. मुंबईत २०२१ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. शहरात दररोज गंभीर स्वरूपाचे किमान १४ गुन्हे दाखल होतात. अहवालात नोंदवल्याप्रमाणे २०२१मध्ये मुंबईत गुन्ह्यांमध्ये २७ टक्के (६३, ६८९ गुन्हे) वाढ झाली आहे. २०२० मध्ये हा आकडा ५०१५८ आणि २०१९ मध्ये ४० ६८४ एवढा होता.

हेही वाचा >>> अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप

हत्याकांडात मुंबई दुसऱ्या स्थानावर

हत्याकाडांच्या घटनांमध्ये देशात दिल्ली शहराचा प्रथम क्रमांक लागतो. दुसऱ्या स्थानावर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. दिल्लीत २०२१ मध्ये ४५४ हत्याकांड घडले तर त्या पाठोपाठ मुंबईत १६२ हत्याकांड घडले. चेन्नईत १६१, बंगळुरूमध्ये १५५ तर गुजरातमधील सुरत शहरात १२१ हत्याकांडाच्या घटना घडल्या. महाराष्ट्रात पुण्यात १०० तर नागपुरात ९५ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत.

महिला अत्याचारात महाराष्ट्र तिसरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अहवालानुसानुर, २०२१ मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँडमध्ये महिलांविरोधातील सर्वात कमी गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर मिझोराम आणि गोव्याचा क्रमांक लागतो. संपूर्ण भारतात एकूण ३१, ६७७ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या. राजस्थानमध्ये बलात्काराच्या सर्वाधिक ६, ३३७ घटनांची नोंद झाली तर मध्यप्रदेश (२,९४७) दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तरप्रदेश (२८४५) तिसऱ्या क्रमांकावर आहे.