लोकसत्ता टीम

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विद्यार्थीभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सुटाव्यात यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मोबाईल ॲपमुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मदत होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचा वेळ वाचत आहे. महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून ‘एमपीएससी’ने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

आधी संकेतस्थळ, नंतर ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयोगाशी थेट संपर्क करता येणे शक्य झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींचा ॲपमध्ये समावेश व्हावा असे ‘एमपीएससी’ने ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात विविध परीक्षांची माहिती आणि जाहिराती तर दिसणारच आहेत.

हेही वाचा… अकोला: धक्कादायक! तीव्र उन्हात रस्त्यावर बाळाचा जन्म; सिमेंट रस्त्यावर प्रसुती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिवाय डॅशबोर्डवर सूचना/परिपत्रके, वेळापत्रके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नसंच, उत्तरतालिका, निकाल या सगळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना या ॲपवरून थेट आयोगाच्या ट्विटर हँडललाही जाता येणार आहे.