वर्धा : वर्धा दारूबंदी जिल्हा असला तरी दारूचे पाट पाण्यापेक्षा वेगाने वाहत असल्याचे चित्र वर्ध्यात नवे नाही. अवैध दारू विक्रेते मग नामी शक्कल लावत चोरीने दारू विकतातच. त्यांची हातचलाखी ओळखून कारवाई करण्याचे चातुर्य मग पोलिसदादा दाखवितात.

दूध विक्रेता की दारू.

पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने देवळी परिसरात अवैध धंदे बंद करण्यासाठी पेट्रोलिंग सूरू केले. तेव्हा त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी कळंब ते वर्धा मार्गावर सापळा रचला. नजर ठेवून असतांना पोलीस चमूस एका हिरो होंडा गाडीवर एक व्यक्ती गाडीच्या दोन्ही बाजूला दूध संकलन करण्यास उपयोगात येणाऱ्या कॅन अटकवून चालल्याचे दिसून आले. त्यास अडवून झडती घेण्यात आली. नजरेस दिसले ते चकित करणारे होते. कॅनमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. त्याची किंमत ५० हजार रुपये तसेच अन्य मुद्देमाल मिळून सव्वा लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. हा दारुसाठा घेऊन येणाऱ्या आरोपीचे नाव प्रशांत रामेश्वर कोंबे असे असून तो वर्धा तालुक्यातील सातोडा येथील राहणारा आहे.

हे ही वाचा…सोलापुरात संशयास्पद ९६ बांधकाम परवान्यांची होणार फेरपडताळणी, बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी

येथून आणली दारू….

सदर आरोपीने हा दारुसाठा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बस स्टॅन्ड बाजूला असलेल्या एम. पी. वाईन शॉप मधून खरेदी केला होता. मनिष जायस्वाल याच्या मालकीचे हे दुकान आहे. त्याच्यावर पण गुन्हे दाखल करीत आरोपी करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद चौधरी तसेच उपनिरीक्षक अमोल लगड, शिपाई मनोज धात्रक, अरविंद येनूरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोले यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा…Video: “अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते”, पोलिसांनी दिली माहिती; गाडी कोण चालवत होतं? म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता चौकशीत नेमके सत्य पुढे येणार. मात्र या कारवाईने दूध विक्रेते पण चक्रावून गेले आहेत. सदर आरोपी हा खरंच दूध विक्रेता आहे का, त्याने दुधाचे कॅन कुठून आणले, यापूर्वी त्याने दारू वाहतूक करण्यासाठी काय काय प्रकार केले हे तपासातून पुढे येईल. कळंब येथून मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करीत ती वर्धा जिल्ह्यात विकण्यास आणण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. पण प्रामुख्याने चारचाकीने तशी वाहतूक होत असते. ईथे तर दूध विक्रेत्याआड चक्क दारू विकणारा निघाला.