वर्धा : पांढरे सोने म्हटल्या जाणाऱ्या कापसावर चोरटे हात मारत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. नैसर्गिक संकटावर मात करीत शेतात वेचणीस आलेला कापूस डौलात उभा आहे. त्यावर कापूस चोरांची नजर पडली. रात्रीत हे भुरटे चोर कापूस वेचून पोबारा करीत असल्याचे गावोगावीचे चित्र आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : दारूची पैसे देत नाही म्हणून नातवाने तोडला आजीचा कान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखणदार परवडत नसल्याने शेतातील कापूस उघड्यावरच असतो. त्याचा फायदा भुरटे घेत आहेत. येळाकेळी येथील संजय दुधबळे यांच्या शेतातील वेचून ठेवलेला नव्वद किलो कापूस चोरीस गेला. त्याची तक्रार सावंगी पोलिसांकडे करण्यात आली आहे. दहा हजार रुपये किंमतीचा हा कापूस चोरीस गेल्याने गावकरी चिंतेत पडले आहेत. अन्य गावातही अशा चोरीच्या घटना घडत असल्याचे ऐकायला मिळाले. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघावे म्हणून शेतकरी या रब्बी हंगामावर भिस्त ठेवून आहे. पण, चोरट्यांनी त्यावरही हात मारणे सुरू केल्याने सर्व त्रस्त आहेत.