Pakistani Spy Latest Updates: नागपूर येथील रहिवासी सुनीता जामगडे प्रकरणी नवीन माहिती उघडकीस आली आहे, ती कामाच्या शोधात पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती. पण पोलीसांना वेगळाच संशय आहे. पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या महिलेवर हेरगिरीचा संशय व्यक्त करीत अमृतसर पोलिसांनी तिच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण कपिलनगर पोलिसांकडे वर्ग केले. तोच धागा पकडून कपिलनगर पोलीस पुढील तपास करणार आहेत. मध्यरात्री तिला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. मॅजिस्ट्रेट यांनी संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर तिला अटक करण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान गुरुवारी दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद – ऐकल्यानंतर तिला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
काय आहे प्रकरण
पंजाब न्यायालयात काम आहे. न्यायालयाचे काम आटोपल्यानंतर काश्मीर फिरायला जाणार असे सांगून सुनीता ४ मे रोजी स्वतःच्या १२ वर्षीय मुलासोबत घरून निघाली होती. कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमानमध्ये ती पोहोचली. तिथे गेल्यानंतर मुलाला परत येते असे सांगून एकटीच निघून गेली. तत्पूर्वी मुलाला घरी पाठवित असल्याचे बहिणीला फोन करून सांगितले. स्थानिक लोकांनी मुलाला लद्दाख पोलिसांच्या स्वाधीन केले होते.कपिलनगर पोलीस सुनीताला रात्री बारा वाजता रेल्वेने नागपुरात घेऊन आले. तिला घरी पाठविता येत नव्हते तसेच ठाण्यातही ठेवता येत नव्हते. अशा स्थितीत न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर हजर तिला केले. मॅजिस्ट्रेट यांच्या आदेशाने तिला पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
ती पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती. मात्र, व्यावसायिक कामानिमित्त संपर्कात असल्याचे ती सांगते. तपासानंतरच खरे काय ते पुढे येईल. पोलिसांनी तिचा मोबाईल, आधार, मतदान कार्ड जप्त केले आहे. जप्त मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी सायबर तज्ज्ञाची मदत घेतली जाईल. मोबाईलमधील चॅट आणि डाटा डिलिट झाला असेल तर तो पुन्हा रिकव्हर करून सखोल तपास केला जाईल. मागील काही दिवसांपासून ती पाकिस्तानातील नागरिकांच्या संपर्कात होती, असा संशय आहे.
पाकिस्तानी नागरिकांशी तिने आधी चॅटिंग केले. नंतर नियंत्रण रेषा ओलांडून ती पाकिस्तानात गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना ती पाकिस्तानात गेली, याकडे पोलिसांनी यांनी लक्ष वेधले. बर्फ दाखविण्यासाठी मुलाला कारगिलमध्ये घेऊन गेली. पैसे संपल्यामुळे कामाच्या शोधात पाकिस्तानात गेल्याचे सुनीता सांगते. मात्र, ती किती खरे किंवा खोटे बोलते आहे, हे आताच सांगता येत नाही. तपासानंतरच या सर्व बाबींचा उलगडा होईल.