वर्धा : हिंगणघाटच्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बनलेल्या पुलावर पुन्हा दुसऱ्यांदा खड्डा पडला असल्याने हिंगणघाटकर भयग्रस्त झाले आहेत.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात केलेल्या रस्ते व उड्डाणपुलांची नेहमी चर्चा होत असते. कारण गडकरी यांच्या कामाचा सपाटा व त्याची गुणवत्ता हे महत्त्वाचे. मी ठेकेदार मंडळींना नाराज करतो पण काम चांगले करवून घेतो, अशी ग्वाही गडकरी देतात. ते खरेच असे गडकरीप्रेमी म्हणतात.

पण आता उपस्थित समस्या गडकरी यांच्या कार्यकुशलतेवर प्रश्न उपस्थित करीत आहे. सेंट जॉन कॉन्व्हेंट नांदगाव चौरस्ता या ठिकाणी बनविण्यात आला होता पूल. या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षा आधी केले होते. आता मात्र या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ हैदराबाद ते कन्याकुमारी असा वर्दळ महामार्ग असून  नांदगाव चौकातील बनविलेला उड्डाणपूल वाहतुकीकरिता धोकादायक ठरत आहे. हिंगणघाट शहराच्या नांदगाव चौकात बनलेला या पुलावर दुसऱ्यांदा खड्डा पडला असून  यानिमित्य राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बनलेल्या पुलावर कामाचा दर्जा समोर आला.  हा पूल आता वाहतुकीकरिता धोकादायक ठरू लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक दिवसरात्र सुरू असते. त्यामुळे अशा प्रकारचे फुलावर अचानक खड्डे पडणे मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.

तेव्हा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी संबंधित कंपनीवर काय कारवाई करणार

हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे . किंवा धोकादायक परिस्थितीत असलेला पुलावर मोठी दुर्घटना कोणाची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही .या निमित्य निकृष्ट बांधकाम आणि ठेकेदार यांनी केलेला भ्रष्टाचार या खड्ड्यांमुळे समोर आला असून हिंगणघाटच्या धोकादायक नांदगाव चौकातील उडान पुलाचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले म्हणतात की, भ्रष्ट कामाचा हा मोठा पुरावा आहे. मी खड्डा पाहून आलो.

मोठी वाहतूक व जड वाहतूक असणाऱ्या मार्गाचे बांधकाम नियम आहेत. आता खड्डा पडल्याने सळाख  ८ एमएम  जाडीची असल्याचे स्पष्ट दिसते. ती २० एमएम जाडीची असली पाहिजे. आमचे म्हणणे आहे की, या मोठी वाहतूक असणाऱ्या मार्गाचे बांधकाम नियमानुसार नसेल तर गडकरी साहेब कारवाई काय करणार ? येथे अपघात होणे निश्चित. त्वरित दुरुस्ती व्हावी ही प्रार्थना. दरम्यान, नितीन गडकरी साहेब, आम्हाला अपघातातून वाचवा …”  अशी मागणी नागरिकांमधू होत आहे.