गोंदिया:- जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती देवरी तर्फे पुराडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात आदिवासी सामूहिक विवाह सोहळा १८ मे रोजी होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी १७ मे ला सायं. ७:०० वाजता मंडप पूजन व प्रसिद्ध आदिवासी गीत गायक राजू उईके नागपूर यांचा गोंडीयन आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम यांच्यासह आदिवासी बांधवांच्या सुरू असलेल्या सामूहिक नृत्यात दोघांनी ठेका धरला.
सुरुवातीला सामूहिक नृत्यात आमदार संजय पुराम यांनी एकटेच नृत्य केले पण नंतर या आदिवासी सामूहिक सोहळ्यात उपस्थित समाज बांधवांच्या आग्रहाखातर आमदार पत्नी सविता पुराम यांनीही आपल्या पतीसोबत सामूहिक नृत्यात सहभागी होऊन आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. रविवारी १८ मे रोजी होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्यातगोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गरीब कुटुंबातील १२१ जोडपे या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत. सामूहिक विवाह सोहळा आदिवासी धर्मातील रीती रिवाज आणि धार्मिक परंपरा नुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागातील कन्यादान योजनेअंतर्गत २५ हजार रुपये अनुदानाचे जोडप्यांच्या थेट खात्यात मिळणार आहेत. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते, सहकार मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून गडचिरोली चे खासदार नामदेव किरसान व आमदार संजय पुराम, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम हे उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त जिह्यातील व तालुक्यातील सर्व नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकारी तसेच समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती मिळून ५ हजार नागरिक उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद देणार आहेत. शनिवारी १७ मे ला सायं. ७:०० वाजता मंडप पूजन व प्रसिद्ध आदिवासी गीत गायक राजू उईके नागपूर यांचा गोंडीयन आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता.
गोंदिया : पुराडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात आदिवासी सामूहिक विवाह सोहळा १८ मे रोजी होणार आहे. या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या पत्नी सविता पुराम यांच्यासह आदिवासी बांधवांच्या सुरू असलेल्या सामूहिक नृत्यात ठेका धरला. pic.twitter.com/P2eHYfMrqJ
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) May 18, 2025
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणारी कन्यादान योजननेचा लाभ नागरिक घेत नसून हा निधी शासनाकडे परत जात होता. या योजनेचा लाभ आदिवासींना व्हावा म्हणून या सामूहिक विवाह सोहळ्याचे पहिल्यांदाच आपण एवढे मोठे आयोजन केले असून या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या खात्यामध्ये २५ हजार रुपये मिळणार असल्याचे आयोजक जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम यांनी सांगितले.