नागपूर : राज्यात साधारण दिवाळीनंतर डिसेंबरपासून थंडीची चाहूल लागते. यावर्षी मात्र, तुलनेने लवकर थंडीची चाहूल लागली आहे. नागपूरसह पुणे, नाशिक, मुंबई या शहरांत थंडी जाणवू लागली आहे.

राज्यातच नाही तर देशभरात हवामानाचे स्वरूप बदलत आहे. साधारण आठवडाभरपूर्वीपर्यंत नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते, पण आता राज्यातील अनेक भागांत तापमानात मोठी आणि वेगाने घसरण होत आहे.

हेही वाचा – रावण दहन परंपरेचा विरोध! रावणाच्या मंदिरासाठी मिटकरींनी दिला २० लाखांचा निधी

हेही वाचा – मोहगावच्या गावकऱ्यांनी निवडणूक टाळली, सरपंचासह सदस्य बिनविरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तापमानात मोठा फरक पडला असून येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर या शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत उत्तर भारतातील थंड भागातून ईशान्येचे वारे येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमानात घट होईल. साधारणपणे पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे.