नागपूर : देशाच्या विविध भागांत रविवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. देशासह राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

भारतीय हवामान खात्याने रविवारी आठ ऑक्टोबरपर्यंत देशातील अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा काही भाग वगळता इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा – ना रुग्णालय प्रशासक, ना अतिदक्षता तज्ज्ञ! शासकीय रुग्णालयांमधील मृत्यू कमी कसे होणार?

हेही वाचा – चंद्रपूर : खाटा कमी, रुग्णसंख्या अधिक!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हवामान खात्याने शुक्रवारी याबाबत अधिकृत माहिती दिली. नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान मुख्यतः कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.