नागपूर : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंबीय शुक्रवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. यात   नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर साकारण्यात आलेल्या ‘बर्ड पार्क’वरही चर्चा झाली. देशातील हा पहिला बर्ड पार्क आहे. जामठ्या जवळ हा बर्ड पार्क आहे. येथे विविध प्रकारच्या फळांची झाडे असून येथील फ‌ळ केवळ पक्षांसाठी आहेत. लोकांना ती खाता येणार नाही, असे एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.जामठा जंक्शनच्या जवळ आठ हेक्टर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आंबा, चिकूसह अनेक फळांची झाडे आहेत. ही फळे फक्त पक्ष्यांसाठी आहेत. पार्कमध्ये सायकल ट्रॅक, कॉफी शॉपही आहे.

 या भागात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविधतेचे निरीक्षण करण्यासाठी तसेच नागरिकांचे मनोरंजन व्हावे म्हणून हिरवीगार जागा उपलब्ध करून देण्याचा दृष्टीकोन बर्ड पार्क विकसित करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवास उपलब्ध होत आहे . नैसर्गिक वातावरण, पार्कचे उद्दिष्ट आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या लोकसंख्येचे संरक्षण होणार आहे.तलाव विविध प्रकारचे कमळ आहेत. वॉटर लिली, पाणथळ पक्ष्यांसाठी निवासस्थान प्रदान करते आणि भूमिगत जलचरांचे पुनर्भरण. ते देखील तयार करेल. वाढलेल्या आर्द्रतेसह सूक्ष्म निवास. पाणवठा असल्याने खोलवर रहिवासी आणि स्थलांतरित दोघांनाही आकर्षित करण्याची क्षमता आहे.

हेही वाचा >>>“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…

तलावाच्या मागे, मूळ भारतीय पाम जसे की, फिनिक्स डेट पाम आणि ताडी पामची लागवड केली जाईल. हे तळवे विविध पक्षी प्रजातीसाठी घरटी उभारण्यात आली आहे. यामुळे सस्तन प्राणी, आणि हॉर्नबिल्स आणि विणकर पक्षी सारख्या प्रजाती आकर्षित होतील.एलआयसी चौक ते ऑटोमोटीव्ह चौक दरम्यान चार स्तरीय उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते म्हणाले, नागपुरात ऑक्सीजन, बर्ड पार्क तयार झाले आहे. येथील सर्व फळे केवळ पक्षासाठी आहेत. हे उद्यान २० एकरमध्ये असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुन्हा २० एकर पार्क साठी देणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ते म्हणाले, काल रात्री माझ्याघरी सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंब आले होते. ते ताडोबा गेले होते. मी त्यांना विशेष करून सूचवले की, बर्ड पार्क बघायला जा. ताडोबाला जाणारी प्रत्येक व्यक्ती नागपूर येथील बर्ड पार्क पाहून पुढे जाईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.