नागपूर: नागपुरातील वर्धा रोडवरील निवासस्थानाहून जवळच असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वर्धा मार्गावर उड्डाण पुलाखालील वाहनतळामुळे नाराज आहे. ते हटवण्यासाठी अनेक वर्षांपासून केलेल्या तक्रारीवर काहीच होत नाही. त्यामुळे होणाऱ्या अपघातामुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे या ज्येष्ठ स्वयंसेवकाचा दावा आहे.
डॉ. अनंत ढोबळे असे या ज्येष्ठ स्वयंसेवकाचे नाव आहे. लोकसत्ताशी बोलतांना डॉ. अनंत ढोबळे म्हणाले, मी तीन वर्षांचा होतो तेंव्हापासून संघाचा स्वयंसेवक आहे. आताही संघाचे काम करतो. वर्धा रोडवरील साई मंदीरच्या शेजारी बाबा ट्रॅव्हल्सजवळ माझे घर आहे. येथील उड्डाणपुलाखाली सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन तळ केले गेले. तसे करता येत नाही.सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत एक निर्णय आहे. पण त्यालाही केराची टोपली दाखवली जात आहे. दरम्यान या वाहनतळामुळे येथील रस्ता अरूंद झाल्याने रोज येथे दोन- तीन अपघात होतात. त्यात स्थानिकांची संख्या जास्त आहे.
याबाबत शासनाच्या विविध संबंधित यंत्रणाकडे अनेक वर्षांपासून निवेदन व तक्रारी दिल्या. परंतु त्यावर काहीच होत नाही. एका सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी मला वाहन तळ हटवण्याला माझी हरकत नाही.असे सांगितले होते. पण काहीच झाले नाही.
सामान्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्यास उपयोग काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात रोड मार्क फाऊंडेशनचे राजू वाघ माझ्याकडे येऊन गेले. त्यांना या समस्येच्या सर्व फाईल दाखवल्या. परंतु आता तेही फोन उचलत नाही.