नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुूर भेटीत शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा… अमरावती : ‘त्‍या’ २२ गावांवर एक रुपयाही वीज थकबाकी नाही..

हेही वाचा… देशात वाघांची संख्या ३५०० हून अधिक! ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात दिल्ली आणि काही दिवसापूर्वी पुण्यात भेट झाली होती. तेव्हा देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे बोलले जात असले तरी सध्या महाविकास आघाडी आणि शिंदे सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी बघता या दोन्ही नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आहेत.