छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. यामध्ये तरुणांनी दगडफेक करत पोलिसांसह खाजगी वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर गुरूवारी रात्री मुंबईतील मालवणी येथे रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या दोन्ही घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. तेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे काही प्रकार घडले आहेत. या दोन्ही ठिकाणी धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटण्याची स्थिती होती.”

Kalmana, murder,
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…
maharashtra minister bhujbal says he is withdrawing from race for nashik lok sabha ticket
‘अमित शहा यांनी निश्चित करूनही उमेदवारी का रखडली?’ नाशिकमधून माघारीची छगन भुजबळ यांची घोषणा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

हेही वाचा : “संजय राऊतांना धमकी देणारा दारूच्या नशेत”, फडणवीसांच्या विधानावर सुनील राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“यावर काही राजकीय लोकांनी मतं व्यक्त केली आहेत. पण, या सगळ्यासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता परिस्थिती निवळली आहे. तसेच, हा धार्मिक प्रश्न आहे. अशीच परिस्थिती पुढे राहणार नाही, याची खबरदारी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी करावी,” असा सल्ला शरद पवारांनी राजकीय नेत्यांना दिला आहे.

“एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र, जेव्हा धार्मिक तेढ वाढेल, अशी शक्यता असते. तेव्हा, राजकारण्यांनी काळजी घ्यावी,” असं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मोदी का घाबरत आहेत? नाना पटोलेंचा सवाल

दरम्यान, शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरातील गडकरींच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात ही दुसरी भेट आहे. या भेटीत ऊसशेती, साखर कारखानदारी आणि शेतकरी या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.