अमरावती : यापूर्वी नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन आपली चूक झाली, आपण अमरावतीकरांची माफी मागतो, असे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्‍हणाले होते, पण ते मुख्‍यमंत्री असताना देशाचे कृषीमंत्री असताना विदर्भासाठी त्‍यांनी काय केले.

त्‍यांच्‍या कार्यकाळात हजारो शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍या. त्‍यांनी या शेतकऱ्यांच्‍या विधवा पत्‍नींची माफी मागायला हवी, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी येथे केली.

ramdas athawale Yogi Adityanath 1
“रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…”
Sharad pawar on PM narendra Modi in Pune
“तेव्हा मीच मोदींना चार दिवस इस्रायलला नेलं होतं”, जुनी आठवण सांगत शरद पवारांची मोदींवर टीका
Sanjay Raut On Devendra Fadnavis
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
Shivsena Thackeray group,
उपमुख्यमंत्र्यांना सभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून पनवेलकरांच्यावतीने पाच प्रश्न
Former Chief Minister Uddhav Thackeray
“आजच्या सरकारला डोकं नाही, फक्त…”; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल
Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…

हेही वाचा…पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान

अमरावती मतदार संघातील भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या प्रचारार्थ सायन्‍सकोर मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्‍यासपीठावर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, प्रताप अडसड, प्रकाश भारसाकळे आदी उपस्थित होते. अमित शाह यांनी आपल्‍या भाषणात काँग्रेससह शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्‍यावर जोरदार टीका केली.

ते म्‍हणाले, शरद पवार यांच्‍या कार्यकाळात विदर्भातील सिंचनाकडे दुर्लक्ष झाले, त्‍यामुळे शेतकरी संकटात सापडले. भाजप-शिवसेना सरकारने सिंचनाचे क्षेत्र वाढविण्‍यासाठी पुढाकार घेतला असून वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्‍पामुळे जलक्रांती घडून येणार आहे.

हेही वाचा…शेतात राबणाऱ्या ‘त्या’ दोघींच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान

उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना अमरावतीत उमेश कोल्‍हे यांची हत्‍या करण्‍यात आली. स्‍वत:ला हिंदूहितरक्षक सांगणारे उद्धव ठाकरे यांनी काहीच कारवाई केली नाही. त्‍यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. महाराष्‍ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. आता कुण्‍या उमेश कोल्‍हेची हत्‍या होणार नाही, असे अमित शाह म्‍हणाले.

भाजपची सत्‍ता पुन्‍हा आली, तर मागासवर्गीयांचे आरक्षण चालले जाईल, अशी अफवा काँग्रेसकडून पसरवली जात आहे. पण, आरक्षण कुठल्‍याही परिस्थितीत हटवले जाणार नाही, ही मोदी यांची गॅरंटी आहे. आम्‍ही बहुमताचा वापर हा ३७० कलम हटविण्‍यासाठी केला. तिहेरी तलाकची प्रथा हटवली. नागरिकत्‍व सुधारणा कायदा आणला. त्‍यामुळे राहुल गांधी यांनी शेखचिल्‍ली प्रमाणे स्‍वप्‍ने पाहू नयेत, अशी टीका अमित शाह यांनी केली.

हेही वाचा…राहुल गांधी म्‍हणतात, “त्‍यांनी वीस-पंचवीस जणांना अरबपती बनवले आम्‍ही कोट्यवधी लोकांना लखपती करणार…”

काश्मीरचे महाराष्ट्रातील जनतेला काय देणे घेणे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केले. काश्मीरसाठी जीव देऊ शकतो, याची त्यांना कल्पना नाही. मोदींनी कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवाद, महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्याचे काम केले, असा दावा त्‍यांनी केला.

जम्‍मू काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री आणि नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे उपाध्‍यक्ष ओमर अब्दुल्‍ला यांनी श्रीनगरच्‍या बडगाम येथे महाराष्‍ट्र भवन बांधण्‍यास विरोध दर्शविला आहे, पण कलानगरचे अब्‍दुल्‍ला हे ओमर अब्‍दुल्‍लाला खांद्यावर घेऊन नाचत आहे, अशी टीका मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. गृहमंत्री अमित शाह हे बंद दाराआड कुणालाही शब्‍द देत नाहीत. त्‍यांचे सर्वकाही उघड आहे. हिंदुत्‍वाच्‍या गळा घोटणाऱ्यांना ते सोडणार नाहीत. नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाचे पठण केल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर देशद्रोहाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्‍यांना चौदा दिवस तुरूंगात डांबले होते, पण त्‍यानंतर महाविकास आघाडीची रावणरुपी लंका जळाली होती, असे एकनाथ शिंदे म्‍हणाले.

हेही वाचा…भाषण रंगात आले अन् अचानक गडकरी भोवळ येऊन पडले…

विदर्भाला काहीच मिळाले नाही – फडणवीस

शरद पवार हे मुख्‍यमंत्री, देशाचे कृषीमंत्री असताना विदर्भाला त्‍यांनी काहीच दिले नाही. आम्‍ही सोयाबीन, कापूस उत्‍पादक शेतकऱ्यांना मदत देण्‍याचा निर्णय घेतला आहे. ४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. आचारसंहिता संपल्‍याबरोबर भावांतर योजनेच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात थेट रक्‍कम जमा होईल, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले. अमित शाह यांचे भाषण अखेरच्‍या टप्‍प्‍यात असताना अवकाळी पावसाचा व्‍यत्‍यय आला.