scorecardresearch

दहावीची परीक्षा देऊन परतणारा विद्यार्थी ठार

दिशांत महादेव पटेल हे मृताचे तर मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

नागपूर :  कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोलपंपासमोर दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील विद्यार्थी जागीच ठार, तर इतर दोन जखमी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला. 

दिशांत महादेव पटेल हे मृताचे तर मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत. हे सर्व तोंडी परीक्षा देऊन मित्रांसोबत एका कन्स्ट्रक्शन साईटवर जात होते.

घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर ठाण्याच्या पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळ गाठून जखमी विद्यार्थ्यांना लाईफ लाईन रुग्णालयात दाखल केले. यातील दिशांत पटेल हा एका मोठय़ा पोलीस अधिकाऱ्याच्या चालकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्यातंर्गत त्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते. शाळेतून तोंडी परीक्षा देऊन तिघेही एकाच दुचाकीने कन्स्ट्रक्शन साईटवर जात होते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students returning from matriculation examination killed in accident zws

ताज्या बातम्या