नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले, तेव्हा तेव्हा त्यांनी खुलासा केला, मात्र राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कधीही खुलासा केला नाही आणि महाविकास आघाडीतील नेते त्यावेळी मूग गिळून बसले होते, अशी टीका राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षाने राज्यपालांबद्दल अपशब्दांचा उपयोग करत टीका केली होती. त्यांची नवीन संकल्पासाठी पुढील वाटचाल असणार आहे, संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे फारसे गंभीरपणे बघितले जात नाही. त्यांच्या पक्षातील नेते त्यांना गंभीरपणे घेत नाही. राऊतांची नवीन डिक्शनरी तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही सांगा, असे मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.