शहरात आता सुपर स्प्रेडरची चाचणी

महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला याबाबत निर्देश दिले होते.

दोन दिवसात १० हजारावर लोकांची चाचणी

नागपूर :  करोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने दहाही झोनमध्ये बाजारपेठा, बँक,  शासकीय आणि खाजगी कार्यालय, दुकाने इत्यादी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर’ची करोना चाचणी करण्यात आली. शनिवारी दहा झोनमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांची चाचणी केली. रविवारीही चाचणी करण्यात आली असून गेल्या दोन दिवसात १० हजारावर नागरिकांची चाचणी झाली.

महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि  संजय निपाणे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे. या कार्यात ११ मोबाइल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा उपयोग कला जात आहे. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत या चाचण्या होतात. सध्या अस्तित्वात असलेल्या चमूव्यतिरिक्त आता नवीन १० चमूसुद्धा चाचणीसाठी  तयार करण्यात आल्या आहेत. नवीन चमूच्या माध्यमातून बालकांची तसेच मधुमेहग्रस्तांची चाचणी होणार आहे.

महापालिकेच्या वतीने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी विशेष शिबीर आयोजित करून चाचणी करण्यात आली. तसेच उद्या, सोमवारपासून विविध आजाराने ग्रस्त, सिकलसेल रुग्ण यांचीही चाचणी होणार आहे. या कार्यात डॉ. संगम मकडम्वाडम्े,  डॉ. पराग ढाके, डॉ. गोपाल समर्थ यांचे सहकार्य मिळत आहे. दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासाठी व्यवस्था आपापल्या झोनमध्ये केलेली आहे. ज्या नागरिकांना करोनासदृष्य लक्षणे आहेत अथवा जे करोना सकारात्मक  व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत, अशांनी चाचणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The city is now testing a super spreader ssh

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!