scorecardresearch

Premium

निवडणूक आयोग आता शाळेतच टिपणार नवमतदार

सर्व शाळेतील वर्ग नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळातर्फे पूनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे.

Election Commission of India
निवडणूक आयोग (संग्रहित छायाचित्र)

वर्धा: भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी आयोगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व पात्र विद्यार्थ्यांची शाळेतच मतदार म्हणून नोंदणी करण्याची विनंती शिक्षण विभागास केली होती. आता तशी सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना केली आहे.

सर्व शाळेतील वर्ग नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळातर्फे पूनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत, दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन मतदार म्हणून नोंदणी अर्ज भरून घेण्यात यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे १ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होत आहे, अशा विद्यार्थ्यांकडून पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात यावे, अशा सूचना आहेत.

School students forced to upload selfies Resentment between parents and teachers
शालेय विद्यार्थ्यांना सेल्‍फी अपलोड करण्‍याची सक्‍ती ; पालक-शिक्षकांमध्‍ये नाराजी
12 exam maharashtra 2024
उद्यापासून बारावीची परीक्षा : कुठल्या केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देणार, काय काळजी घ्यावी?
Colleges are responsible for barring ineligible students in BHMS examination
बीएचएमएस परीक्षेत अपात्र विद्यार्थ्यांना रोखण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर, आरोग्य विद्यापीठाची सूचना
nashik beekeeping training marathi news, yashwantrao chavan maharashtra open university marathi news
नाशिक : आदिवासींना मधुमक्षिका पालनासाठी मुक्त विद्यापीठातर्फे प्रशिक्षण, प्रस्ताव तयार करण्याची सूचना

हेही वाचा… रेशन लाभार्थ्यांना उद्यापासून आनंदाचा शिधा! गोंदिया जिल्ह्यात २.२० लाख किट उपलब्ध

ऑनलाईन माध्यमातून नवीन मतदार नोंदणीसाठी विविध उपक्रम राबवावेत,असे सांगण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाचे नमुने उपलब्ध करून घ्यावे. ते विद्यार्थ्यांकडून भरून घेत कार्यालयास सादर करायचे आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The election commission of india has instructed the schools to register all eligible students as voters in schools pmd 64 dvr

First published on: 31-10-2023 at 13:25 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×