नागपूर : मागील आठवड्यात मुसळधार आणि सलग सहा दिवस पावसाने हजेरी लावली. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला पाऊस बेपत्ता झाला आणि उकाड्यात प्रचंड वाढ झाली. दरम्यान, आता पुन्हा एकदा पाऊस परतण्याच्या मार्गावर असून हवामान खात्याने आज विदर्भाला “येलो अलर्ट” दिला आहे. कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भाच नाही तर संपूर्ण राज्यातच अनेक भागात पावसाने उघडीप दिली. आणि लागलीच उकड्यात प्रचंड वाढ झाली. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तिशी पार पोहोचला आहे. कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. उत्तर झारखंड, दक्षिण बिहार आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, तीव्र कमी दाबाचे केंद्र, हमीरपूर, झारखंडमधील क दाबाचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर झारखंड, दक्षिण बिहार आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे.
उत्तर राजस्थान आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, तीव्र कमी दाबाचे केंद्र, हमीरपूर, झारखंडमधील कमी दाबाचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.दरम्यान, हवामान खात्याने आज बुलडाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवली असून दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हा पाऊस सतत कोसळणार की पुन्हा उकाड्यात वाढ होणार हे अजून स्पष्ट नाही.