नागपूर : निवडणूक ही संघटना मजबूत करण्याचे माध्यम आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करावे, लोकांना पक्षासोबत जोडावे तरच संघटना मजबूत होईल. पण, असे झाले नाही तर काँग्रेस पक्ष केवळ निवडणुकीत लावण्यात येणाऱ्या पोस्टरमध्येच दिसेल, अशा शब्दांत माजी मंत्री सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.

हेही वाचा – सरकार कोसळण्याच्या पटोलेंच्या दाव्यावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आणखी २० आमदार…”

हेही वाचा – “महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर अन्यायच केला”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर शिक्षक मतदासंघातील महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले यांची प्रचार सभा जवाहर विद्यार्थीगृह येथे रविवारी आयोजित करण्यात आली होती. येथे सुनीर केदार बोलत होते. ते म्हणाले, काही काँग्रेस पक्षाचे नेते संघटना कुठे आहे, असे विचारतात. संघटना काही दुकानातून विकत घेण्याची गोष्ट नाही. त्यासाठी सातत्याने विचार करावा लागतो. संधी मिळेल तेव्हा कृतीतून लोकांना जोडावे लागते. तेव्हा संघटना उभी राहते. पण, तसे केले नाही, तर काँग्रेस फक्त निवडणुकीतील पोस्टरमध्येच शिल्लक राहील, असे केदार म्हणाले.