बुलढाणा : खामगाव शहरात दोन बंगल्यात दरोडा पडला. सहा सदस्यीय दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले असले तरी ऐवज कितीचा लंपास झाला ते स्पष्ट झाले नाही. कारण दोन्ही घरमालक परगावी गेले असून ते परतल्यावरच नेमकी रक्कम कळणार आहे.

हेही वाचा – नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक

हेही वाचा – ‘‘राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे…”, रुग्णालयातील मृत्युसत्राबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदर्श नगर भागात आज शनिवारी उत्तररात्री सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. हे सहा सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या टोळीने दोन बंगल्यात दरवाजे तोडून प्रवेश केला. अनेक तासांनंतरही दरोड्याची रक्कम किती याचा शोध घेण्यात येत आहे. घरमालक खामगावात आल्यावरच याचा उलगडा होईल.