फुलपाखरू बघितले की कोणतंही लहान मुल त्याच्यासोबत आनंदाने बागडू लागते आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. फुलपाखरू पकडण्यासाठीची दोन लहान मुलींची गडबड हेरून दोन अल्पवयीन मुलांनी या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मारेगाव तालुक्यात उघडकीस आला.मारेगाव तालुक्यातील एका गावात रविवारी १९ मार्च रोजी दोन सहा वर्षीय मुली फुलपाखरांमागे लागल्या. ही बाब त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या ११ आणि १४ वर्षीय दोन मुलांच्या लक्षात आली. या अल्पवयीन मुलांनी त्या चिमुकल्या मुलींना फुलपाखरू पकडून देण्याच्या बहाण्याने गावाबाहेर ओसाड माळरानावर एका पडक्या घरात नेले.

हेही वाचा >>>नागपूर: कॅन्सर रुग्णालयाचा चेंडू आता ‘एनएमआरडीए’च्या ‘कोर्टात’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुली घरी परतल्यानंतर त्या घाबरलेल्या दिसल्याने त्यांच्या आजीने विचारणा केली. तेव्हा मुलींनी घडलेला प्रकार सांगितला. आजीने हा प्रकार मुलींच्या पालकांना सांगितला. मुलींच्या पालकांनी दोन्ही मुलांच्या पालकांना याबाबत जाब विचारला. अखेर बुधवारी मुलींच्या पालकांनी दोन्ही मुलांविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्ष बालकांविरोधात विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत. या घटनेने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.