लोकसत्ता टीम

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर आज, सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवासी ठार झाले. भरधाव कार सिमेंट रेलिंगला धडकल्यावर वाहनाने पेट घेतला. त्यात दोघे जण होरपळल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

आज सकाळी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज ३०५ वर नागपूर येथून शिर्डीकडे जाणारी भरधाव कार (एमएच ०२ सीआर १४५९) ही सुरुवातीला सिमेंटच्या रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या कारमधून तीन प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने एक प्रवासी धक्क्याने बाहेर फेकल्या गेल्याने बचावला. मात्र तो गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा… अमरावती : घोषणेत अडकले रिद्धपुरातील मराठी विद्यापीठ; समितीची स्थापना कधी? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आग लागलेल्या कारमध्ये अडकलेल्या दोघांचा भाजून मृत्यू झाला. अजय दिनेश भिलाला (शाजापुर, मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव आहे. महामार्ग पोलीस पुढील चौकशी करत आहेत. घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नाही.