नागपूर : सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षांतील अर्थिक व्यवहारांची चौकशी लावणे दुर्दैवी आहे. त्या २५ वर्षांतील २० वर्षे जे आमच्याबरोबर होते, तेच आता चौकशीवर चर्चा करताहेत. आगामी निवडणुका लक्षात ठेवून ही चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई राजकीय दृष्टीकोनातून आहे, असे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघत आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी केला आहे. त्याची साधी कॅगद्वारे चौकशी होत नाही. एकीकडे इतर महापालिकेतील भ्रष्टाचारावर कॅगची चौकशी करू द्यायची नाही आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेची चौकशी करायची, असा प्रकार सुरू आहे. ज्या आयुक्तांच्या कार्यकाळात या सर्व गोष्टी झाल्यात त्यांनाच प्रशासक म्हणून ठेवायचे. पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या. असलेल्या ठेवीतून शहर स्वच्छ करत असल्याचे दाखवायचे, असा प्रकार सुरू आहे, असे आमदार अहिर म्हणाले.

हेही वाचा – नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीचे संकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब का? विरोधी पक्ष आक्रमक

एसआयटीला सामोरे जाणार

दिशा सॅलियन प्रकरणी नेमलेल्या एसआयटीद्वारे आदित्य ठाकरेंना बोलाविले जाणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. ही चौकशी पारदर्शकपणे होणार असेल तर आम्ही त्याला सामोरे जाऊ. त्यातून काही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्यापुढे आहे, असे अहिर म्हणाले.