वर्धा : शासकीय वास्तू म्हणजे उदासीनतेचा गंध देणारी आणि पुन्हा येऊ नका, असा अप्रत्यक्ष निरोप देणारी, असे म्हटल्या जाते. मात्र, त्यास छेद देणारे उदाहरण वर्ध्यात दिसून येत आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगी रंगात न्हाऊन निघाली आहे. आज वर्धेकर ही रोषणाई पाहण्यास गर्दी करीत आहे.

राज्यातील सर्वात उत्कृष्ट प्रशासकीय इमारत अशी पावती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यास ‘चार चांद’ लावण्याचे काम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व चमूने केले आहे. विविध रंगात ही इमारत आज न्हावून निघाली आहे. ही इमारत गो ग्रीन संकल्पनेवार आधारित आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे शक्तीस्थान आहे. भारतीय स्थापत्य शैली प्रेरणा आहे. तळ मजल्यावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी कक्ष तसेच ३०० आसन क्षमतेचे नियोजन सभागृह तयार आहे. दिव्यांग तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह आज सेवेत आहे. इंग्रजकालीन इमारत पाडून ही नवी इमारत उभारण्यात आली आहे.

Two people drown Wardha, Independence Day holiday,
वर्धा : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी बेतली जीवावर; दोन बुडाले, तर एक बचावला…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
sahas raghatate latest marathi news
वर्धा : वय वर्ष चार अन् विक्रमास गवसणी, जाणून घ्या चिमुकल्याची कामगिरी…
tehsil office, Sindi railway,
वर्धा : भर रस्त्यात तहसील कार्यालय, तिथेच नायब तहसीलदाराची नियुक्ती…
Two people washed away, flood Wardha,
वर्धा : दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले, दोन दिवसात…
leopard in wardha marathi news
Wardha Leopard: सावधान! वर्ध्यात बिबट, हिंगणघाटात वाघाचा वावर
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
bar owner Nagpur, liquor Wardha,
वर्ध्यात दारू पुरवठा करणाऱ्या नागपूरच्या बार मालकावर गुन्हा; २१ लाखांचा…

हेही वाचा – President Medal :नागपुरातील चौघांना राष्ट्रपती पोलीस पदक

आज खास सजावट करण्यात आली. राज्यात सर्वोत्कृष प्रशासकीय इमारतीचा दर्जा मिळाला. म्हणून ती राष्ट्रीय सणास उजळून निघावी, हा प्रयत्न प्रशासनाने केला. गर्द रंगातील ४० ब्रास बारमध्ये ७० ते ८० प्रकाश दिवे चमकतात. ते तिरंगी रंगात ठळक दिसावे अशी सूचना कंत्राटदारास करण्यात आली होती. ते यशस्वी झाल्याने ही वास्तू तसेच परिसरातील महात्मा गांधी पुतळा, नगर पालिका इमारत, तसेच काही शहिद स्मारक लक्षवेधी झाल्याचे दिसून येते. ही रोषणाई जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सुचविली होती. पण बांधकाम विभागाने त्यावर तत्पर अंमल केला. मात्र विभिन्नरंगी उधळन आज झाली आणि वर्धेकर नागरिकांनी सेल्फीसाठी एकच झुंबड केल्याची प्रतिक्रिया माहिती कार्यालयाने दिली. हौशी फोटोग्राफर राहुल तेलरांधे यांनी या चमचमत्या इमारतीचे देखणे फोटो काढले आहेत.

हेही वाचा – अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याला तिरंगी साज; स्‍वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्‍येला…

वास्तू अद्ययावत करण्याचे तसेच पारंपरिक बाज राखण्याचे मोठे आव्हान होते. पण तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यास भक्कम पाठिंबा दिला. निधी वेळेत मिळत गेला आणि परिश्रम सार्थकी लागले, अशी नोंद एका वरिष्ठ अभियंत्याने केली आहे. आजची रात्र मात्र सेल्फी फंडा ठरल्याचे चित्र आहे. तीन दिवस उजळणार.