scorecardresearch

नागपूरच्या जी-२०’ बैठकीत कशावर होणार चर्चा?

‘जी-२०’ परिषदेत सुमारे १४० सदस्य या परिषदेत सहभागी होणार असून त्यानिमित्ताने शहराच्या प्रमुख भागांची सजावट केली जात आहे

conference of 'G-20
नागपूरमधील ‘जी-२०’ गटाच्या परिषदेला विशेष महत्त्व

नागपूर येथे येत्या २१ व २२ मार्च रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत ‘सिव्हिल सोसायटी ऑर्गनाजेशन्स’ अर्थात नागरी समाज संस्था (सी-२०) या ‘जी-२०’ समूहातील गट सहभागी होणार आहे. हा गट आर्थिक हितसंबंध आणि नागरिकांचे हित यांच्यात संतुलन राखण्यात मदत करतो. त्याअनुषंगाने नागपूरमधील ‘जी-२०’ गटाच्या परिषदेला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार विप्लव बाजोरिया आहेत तरी कोण? जाणून घ्या…

‘जी-२०’ परिषदेची जय्यत तयारी नागपुरात सुरू आहे. सुमारे १४० सदस्य या परिषदेत सहभागी होणार असून त्यानिमित्ताने शहराच्या प्रमुख भागांची सजावट केली जात आहे. या सजावटींमुळे या परिषदेत सर्वसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेत जी समूहातील नागरी समाज संस्थेचा (सी-२०) गट सहभागी होणार आहे.

हेही वाचा- नागपूरमधील गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोलदांडा कोणाचा?

सी-२० गट जागतिक चारित्र्य, पारदर्शकता, स्वातंत्र्य, सहयोग, मानवी हक्क, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण या तत्त्वांवर कार्य करतो. या गटाचे मुख्य कार्य सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि जागतिक आर्थिक धोरणे आखताना त्यात नागरिकांच्या अपेक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी शिफारशी करण्याचे आहे. जगभरातील अशासकीय व सेवाभावी नागरी समाज संस्थांचे म्हणणे मांडण्यासाठी सी-२० हे हक्काचे जागतिक व्यासपीठ मानले जाते. ‘जगातील कोणीही व्यक्ती विकासप्रक्रियेत मागे राहू नये’ या दृष्टिकोनातून सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा- ‘ते’ संपूर्ण कुटुंब जेव्हा कॅमेऱ्यात कैद झाले

प्रत्येक व्यक्ती नागरी समाजाचा घटक आहे. नागरिकांच्या हितासाठी कार्यरत शासकीय आणि खाजगी या दोन क्षेत्राशिवाय उर्वरित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांसह समावेश नागरी समाज संस्थांमध्ये होतो. यात सामाजिक कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक चळवळी तसेच सत्तेत नसलेल्या राजकीय संस्थांचा समावेश आहे. ‘आशा, स्वयंप्रेरणा आणि निःस्वार्थ सेवेच्या ज्योती’ हे ‘सी-२०’ चे बोधचिन्हाचे प्रतीक असून यावर “तुम्हीच प्रकाश आहात” हे घोषवाक्य आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 11:20 IST