नागपूर : सार्वजनिक ठिकाणी महिलांनी तोकडे कपडे परिधान करणे ही अश्लीलता नाही. ही सामान्य बाब झाली असून याचा सामान्य नागरिकांना त्रास होत नाही, असे निरीक्षण एका प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे.

हेही वाचा – शेतकरी विधवासाठी ‘हॅशटॅग तेरवं’ चळवळीचे लाँचिंग १७ ला

हेही वाचा – ऑनलाईन हेडफोनची ऑर्डर केली, पण मिळाला दगड; नेमकी काय आहे भानगड? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एका होटलवर ३१ मे रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत तोकडे कपडे घालत सहा महिला नृत्य करत होत्या. या कारवाईविरोधात ललित बैस, अभय भागवत, गोपाल व्यास, मनीष सराफ आणि समीर देशपांडे यांनी न्यायालयात धाव घेतली. महिलांच्या तोकडे कपडे परिधान करण्याला संकुचित दृष्टीकोनातून पाहणे प्रतिगामी ठरेल. पुरोगामी दृष्टीकोन स्वीकारत न्यायालय महिलांच्या तोकडे कपडे परिधान करण्याला अश्लीलता मानत नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले.