14 August 2020

News Flash

इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

११वी प्रवेशाचे काय, हा पालकांना पडणारा प्रश्न सोडविण्याचे कामही शिक्षण मंडळाने केले आहे.

संग्रहित छायाचित्र

नाशिक :  इयत्ता १०वी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार हे निश्चित नसले तरी शिक्षण मंडळाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षांसाठी ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १०वीचा निकाल जाहीर होईपर्यंत पहिल्या टप्प्यातील काम सुरू राहणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा यंदा करोना संकटामुळे ऑनलाइन झाला असून विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणे सुरू झाले आहे. जुलै, ऑगस्टमध्ये करोनाची परिस्थिती कशी राहील, यावर प्रत्यक्ष शाळेत वर्ग भरविण्यात यावेत की नाही त्याचा निर्णय घेतला जाईल. ११वी प्रवेशाचे काय, हा पालकांना पडणारा प्रश्न सोडविण्याचे कामही शिक्षण मंडळाने केले आहे.

१ ते १५ जुलै या कालावधीत महापालिका तसेच जिल्हा परिसरातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे.

२ ते १६ जुलै या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदवलेली माहिती तपासून ऑनलाइन अंतिम करण्याचे काम करण्यात येणार आहे.

१५ जुलैपासून १०वी परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने ऑनलाइन नोंदणी करणे, प्रवेश अर्जातील पहिला भाग भरणे, माहिती अचूक आहे की नाही याची खातरजमा करणे ही कामे होतील.

विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग एक ऑनलाइन तपासून खात्री करण्यासाठी शाळा स्तरावरून संपर्क करण्यात येईल.

१६ जुलैपासून निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग भरून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक पु. म. पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:11 am

Web Title: class 11 online admission process started zws 70
Next Stories
1 आॉनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण 
2 झोपडपट्टय़ांमध्ये करोना शिरकावाने प्रशासनापुढील आव्हानात भर
3 घरमालक भाडेकरू वादात महिलेचा मृत्यू
Just Now!
X