तळेगावच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात निर्माण झालेला तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नाही. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील बससेवा आणखी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, अफवा रोखण्यासाठी नाशकातील इंटरनेट सेवा आणि मद्याची दुकानेही आणखी तीन दिवसांसाठी बंद राहतील, अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली आहे. सोमवारपासून भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि एकत्रित स्वरुपात लघुसंदेश पाठविण्याची सेवा बंद करण्याचा सकारात्मक परिणाम झाला. ओसंडून वाहणाऱ्या अफवांचे पीक रोखण्यात यंत्रणेला यश आले. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.
‘तळेगाव’च्या निमित्ताने राजकीय हिशेब चुकते करण्यावर भर
तळेगावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळण्याच्या दृष्टीकोनातून विजयादशमीच्या दिवशी ग्रामीण पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने दोन दिवस बंद ठेवलेली शहर बस आणि बाहेरगावी जाणारी बस सेवा सुरू केली. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांबरोबर सणोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला होता. मात्र, वातावरण शांत होत असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर भागात युवकांचे जत्थे दुचाकीला विशिष्ठ झेंडे लावून महापुरूषांच्या नावाने घोषणाबाजी करत भ्रमंती करत होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून तणावात भर पडली. दरम्यान, आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राज्यमंत्री दादा भुसे यांनी तळेगावात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली. वातावरण शांत होत असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर भागात युवकांचे जत्थे दुचाकीला विशिष्ठ झेंडे लावून महापुरूषांच्या नावाने घोषणाबाजी करत भ्रमंती करत होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून तणावात भर पडली.
राज्य परिवहनचे दोन कोटीहून अधिक नुकसान