नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४० हजार ८३५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी छापील वीज देयक नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सेवेचा पर्याय स्वीकारला आहे. महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. अशा प्रकारची नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ग्राहकांची ४९ लाख रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे.

वीज देयकासाठी ई-मेल आणि लघूसंदेशचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज देयकामागे १० रुपयाची सवलत दिली जात असून इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षण व सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra new housing policy to benefit builders
विश्लेषण : राज्याचे गृहनिर्माण धोरण विकासकांच्या फायद्यासाठीच?
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
To avoid repeat of incident during Navratri festival police started patrolling in bhiwandi
भिवंडीची पूनरावृत्ती टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात पोलीस सतर्क समाजमाध्यमांवरील अफवांवर पोलिसांचे लक्ष, गस्तीवर भर
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
pcmc to construct biodiversity park in talawade says commissioner shekhar singh
पिंपरी : तळवडेत साकारणार जैवविविधता उद्यान; स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंपनीला ७६ कोटींचे काम
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड

हेही वाचा… धुळे पोलिसांनो, कार्यालयात उशिरा याल तर सावधान…

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात २४ हजार ३८३ आणि अहमदनगर जिल्ह्यात १६ हजार ४५२ अशाप्रकारे एकूण नाशिक परिमंडळात ४० हजार ८३५ वीज ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून ही योजना सुरू केली आहे. यामध्ये वीज देयक छापीलऐवजी फक्त ई-मेल व लघूसंदेशचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती देयकात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज देयकात वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीज देयक तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच लघूसंदेशाद्वारे दरमहा ते प्राप्त होत असल्याने ग्राहकांना ते तात्काळ घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. सोबत ऑनलाईन वीज देयक भरल्यास ग्राहकाला वीज देयकाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयेपर्यंत सवलत मिळते.

हेही वाचा… पूल खचल्याने मनमाडमध्ये वाहतूक कोंडीचे संकट; स्थानिकांसह प्रवाश्यांचे हाल

वीज ग्राहकांना छापील वीज देयकांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेली देयके संगणकात जतन करता येईल. महावितरणच्या संकेतस्थळावर १२ महिन्यांची देयके उपलब्ध असतात. आवश्यकतेप्रमाणे ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट काढण्याची सोय आहे. पर्यावरणाच्या समृद्धी व वीज खर्च कमी करण्यासाठी गो-ग्रीन या पर्यायाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.