नाशिक : उपनगर येथे झालेल्या गोळीबारातील टोळीचा शुटर तथा मोक्कातील फरार आरोपी बारक्या यास गुंडाविरोधी पथकाने पुण्यात बेड्या ठोकल्या. संशयित मयूर बेद, संजय बेद, टक्कु उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, इर्शाद चौधरी, दीपक चाट्या, गौरव गांडले यांनी मुलगा राहुल उज्जैनवाला याच्याशी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून उपनगर परिसरात बर्खा उज्जैनवाला यांच्यावर घरी जावून बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवत दोन गोळ्या झाडल्या.

लोकांची गर्दी झाल्याने संशयित पळून गेले. संशयितांविरुध्द उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या. गुंडाविरोधी पथकाला याविषयी आदेश देण्यात आले.

हेही वाचा…नाशिक : समर्थकांची भक्ती, उमेदवारांची शक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्ह्यातील आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे हा गुन्हा घडल्यापासून स्वत:ची ओळख लपवून गोवा, मुंबई, उज्जैन, शिर्डी, पुणे असा फिरत राहिला. बारक्या हा लोणीकंद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने लोणीकंद आणि हडपसर या ठिकाणी वेशांतर करून सापळा रचला. परिसरातील हॉटेल तसेच अन्य ठिकाणी चौकशी केली असता संशयित फिरस्ता असून सायंकाळी खाण्यापिण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून बारक्याला ताब्यात घेतले. त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.