नाशिक : दुचाकी नीट चालविण्याचा सल्ला दिल्याने तीन युवकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर परिसरात घडली. यावेळी शस्त्राचाही वापर झाल्यामुळे विद्यार्थी जखमी झाला. याबाबत शारोन कसबे (२२, माऊली लॉन्सजवळ, कामटवाडे) या युवकाने तक्रार दिली. कसबे औरंगाबाद नाका येथील ब्रम्हा व्हॅली महाविद्यालयात परीक्षेसाठी जात असताना ही घटना घडली. मोटारसायकलने तो गंगापूर रोडमार्गे जात असतांना प्रमोद महाजन उद्यानाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकी चालकाने मोटारसायकलला धक्का दिला. यावेळी कसबेने गाडी नीट चालविण्याचा सल्ला दिला असता दुचाकीवरील तिघांनी त्यास शिवीगाळ केली. बेदम मारहाण केली. संशयितांनी धारदार शस्त्राचा वापर केल्याने कसबे यांना दुखापत झाली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2023 रोजी प्रकाशित
नाशिक : वाहन चालकास सल्ला दिल्याने मारहाण
दुचाकी नीट चालविण्याचा सल्ला दिल्याने तीन युवकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर परिसरात घडली.
Written by लोकसत्ता टीम
नाशिक

First published on: 09-06-2023 at 11:14 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assaulted for giving advice to motorist nashik news ysh