नाशिक – गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे गतवर्षी उघड झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णत: प्रतिबंध करण्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने मान्य केले. गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून आवाजाच्या भिंती (डीजे) उभारण्यास मुभा देण्यात आली. तसेच महानगरपालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या मंडप शुल्कात आणि परवानगी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव – २०२३ वर्षीच्या सर्वोत्कृष्ट मंडळांना पारितोषिकाने गौरविण्यात आले. बैठकीतील चर्चेची माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली.

Shiv Sena Dipesh Mhatre billboards banned in Thakurli Cholegaon dombivli
ठाकुर्ली, चोळेगाव हद्दीत शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचे जाहिरात फलक लावण्यास बंदी; चोळेगाव ग्रामस्थांचा निर्णय
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Dr Neelam Gorhe suggestion regarding against women oppression Pune news
महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज- डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
Action against harassment of women Police will patrol during Navratri festival
पिंपरी : दांडियात महिलांची छेडछाड काढल्यास ‘दंडुका’; नवरात्रोत्सवाच्या काळात पोलीस पायी गस्त घालणार
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
DJ ban order, Ganesh utsav, High Court mumbai,
डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती
Ganesh immersion processions without band in Thane
यावर्षीही ठाण्यात ढोलाताशांविना विसर्जन मिरवणुकांचा थाट
eco-friendly Ganeshotsav concept
ठाणेकरांचा पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पनेला प्रतिसाद

हेही वाचा >>> नाशिक : छेड काढणाऱ्या चार टवाळखोरांना मायलेकीने शिकवला चांगलाच धडा

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांकडून लेझर किरणांचा वापर केला गेला. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या आणि सहभागी झालेल्या भक्तांच्या डोळ्यांना इजा झाली होती. काहींच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर, लेझर दिव्यांविषयी चर्चा झाली. नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी या दिव्यांच्या वापरास पूर्णत: बंदी आणण्याचे मान्य केल्याचे भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राष्ट्रपुरुषांना वेठीस धरण्यापर्यंत वैफल्यग्रस्तांची मजल – केशव उपाध्ये यांची टीका

आवाजाच्या भिंती उभारण्याचा (डीजे) अनेक गणेश मंडळांचा आग्रह कायम राहिला. ध्वनिप्रदूषणविषयक नियमांचे प्रत्येकाला पालन करावे लागेल. मर्यादित डेसिबल, जेणेकरून प्रदूषण होणार नाही, नियमांचे पालन करून कुठलेही वाद्य वाजविण्यास परवानगी दिली जाईल, असे भुसे यांनी सांगितले. गणेश मंडळांकडून मंडप उभारणीसाठी शुल्क आकारले जाते. नाशिकपुरते मंडप शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परवानगी शुल्कातही सवलत देण्यात आली. पावसात शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली.

गणेशोत्सव -२०२३ मधील मंडळांचा गौरव

गणेशोत्सव स्पर्धेत परिमंडळ एकमध्ये सोमवार पेठेतील वेलकम सहकार्य मित्रमंडळ, पंचवटीतील कैलास मित्र मंडळ, गंगापूर रस्त्यावरील अण्णासाहेब मुरकुटे मित्र मंडळ, परिमंडळ दोनमध्ये सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती, अंबड येथील शिव कपालेश्वर युवा प्रतिष्ठान, एकता संस्था मंडळ, कपालेश्वरचा राजा मित्र मंडळ आदींना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

सूचनांचा पाऊस

विसर्जन मिरवणूक दामोदर चित्रपटगृहापासून पुढे जाण्यास विलंब होतो, मिरवणुकीला वेळ वाढवून द्यावा, वीज जोडणीसाठी अनामत रक्कम, विजेचा लपंडाव कमी करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, मिरवणुकीत स्वागत कक्ष एकाच बाजूला ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, रात्रीच्या वेळी गणेश मंडपांना संरक्षण, गणेशोत्सवात काँक्रिटीकरणाची कामे थांबविणे, वाहतुकीचे नियमन आदी सूचना गणेश मंडळांकडून करण्यात आल्या.