जळगाव : मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी तसेच छठ पुजेच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन उत्तर भारताकडे मुंबईसह पुण्याहून अनेक उत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या. सण-उत्सव आटोपल्यानंतर आता त्या सर्व गाड्या शुक्रवारी परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. त्यांचे जिल्ह्यातील भुसावळ स्थानकावरील वेळापत्रक जाहीर झाले आहे.

मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी तसेच छट पुजेच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन पुणे-दानापूर, पुणे-गोरखपुर, हडपसर-गाजीपूर सिटी, हडपसर-दानापूर, हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झासी, बनारस-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस, सहरसा-लोकमान्य टिळक टर्मिनस, बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस या उत्सव विशेष गाड्या चालविण्यात आल्या.

ज्यामुळे मुंबईसह पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसोबत महाराष्ट्रातील प्रवाशांची गर्दीच्या हंगामात मोठी सोय झाली. आता या सर्व गाड्या परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष रेल्वे सेवांचा लाभ घेऊन गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

०१०३२ बनारस-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष रेल्वे गाडी बनारस येथून शुक्रवारी पहाटे ०४.०० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे ००.२५ वाजता पोहोचेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.१५ वाजता पोहोचेल.

०१०८० गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष रेल्वे गाडी गोरखपूर येथून शुक्रवारी दुपारी ०२.३० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी ०३.२० वाजता पोहोचेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर पहाटे ००.४० वाजता पोहोचेल.

०११४४ दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे गाडी दानापूर येथून शुक्रवारी रात्री ०९.३० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री ०८.२५ वाजता पोहोचेल तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल.

०५५८५ सहरसा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे गाडी सहरसा येथून शुक्रवारी दुपारी ०५.४५ वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर सकाळी ०५.३० वाजता पोहोचेल.

०१०५२ बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे गाडी बनारस स्थानकावरून शुक्रवारी सकाळी ०६.३५ वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.१० वाजता पोहोचेल तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर दुपारी ०४.४० वाजता पोहोचेल.

०१४१६ गोरखपूर-पुणे विशेष रेल्वे गाडी गोरखपूर स्थानकावरून शुक्रवारी दुपारी ०५.३० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी ०५.०० वाजता पोहोचेल तसेच पुणे स्थानकावर सकाळी ०३.१५ वाजता पोहोचेल.

०१४५० दानापूर-पुणे विशेष रेल्वे गाडी दानापूर स्थानकावरून शुक्रवारी सकाळी ०५.३० वाजता सुटेल. ही भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.५० वाजता पोहोचेल तसेच पुणे स्थानकावर दुपारी ०६.१५ वाजता पोहोचेल.

०१४५८ दानापूर-हडपसर विशेष गाडी दानापूर स्थानकावरून शुक्रवारी रात्री ०७.०० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०७.०० वाजता पोहोचेल तसेच हडपसर येथे सकाळी ०६.२०वाजता पोहोचेल.